भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मोठी बातमी : अखेर आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत, आचारसंहिता लागली. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

आज 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

या आहेत निवडणुकीच्या तारखा
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाहीये.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!