भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मतदार याद्यां सदोष,निवडणुका पुढे ढकलणार? वातावरण तापले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विरोधकानी मतदार यांद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. परंतु निवडणूक आयोगाने काल स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यावरून वातावरण तापले आहे. ठाकरेंवर निशाणा साधताना यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विरोधकांनी मतदार याद्या सदोष असल्याचा धोशा लावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर आरोपांचे मोहोळ हुलवले. त्यानंतर महाविकास आघाडी, मनसे, डावे, शेतकरी पक्षाने मतदार याद्यांमधील दुबार, तिबार नावावर आक्षेप घेतला. मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन केले. काल दंड बैठका मारल्यानंतर विरोधकांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट घेतली. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी विरोधकांना फटकारले आहेत.

आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘दगाबाजरे’ अशी सरकारविरोधात मोहीम आरंभली. कर्जमाफीतर दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदतही मिळाली नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.त्यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाही. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला. विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!