भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

मोठी बातमी : गिरीश महाजनांचा “एकला चालो” चा नारा..! भाजप पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत..

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मंत्री गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकी साठी एकाला चालो चा नारा दिला आहे. पालिका निवडणुकीत आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. राज्यात पालिका निवडणुकीत सर्वाधिक उत्तर महाराष्ट्रात भाजपला यश मिळणार आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विश्वास व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकीत एकाला चालो चे संकेत दिले आहेत. आपल्याला महाराष्ट्रात रेकॉर्ड करायच आहे. राज्यात पालिका निवडणुकीत सर्वाधिक यश भाजपला उत्तर महाराष्ट्रात मिळणार असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला असल्याने महा युतीतील घटक पक्षाच्या भुवया उंचावल्या आहेत. एक प्रकारे गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत तर दिले नाहीना?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!