भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनंदुरबारमहाराष्ट्र

पाचशे रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करता दर महिन्याला एक हजारांची लाच मागून पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य करीत लाच स्वीकारणाऱ्या मोलगी, ता. अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील मिलाप बाळू शिंदे वय ४४ वर्ष या हवालदारास नंदुरबार एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.

तक्रारदार यांनी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी
तक्रार दिली की, त्यांचे मालकीचे बोलेरो चारचाकी वाहन असून ते मागील ५ वर्षांपासून जामली ते मोलगी अशी प्रवासी वाहतुक करतात.

तक्रारदार यांचे वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हवालदार मिलाप शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे दरमहा १००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती ५०० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्या नुसार मिलाप बाळू शिंदे वय ४४ वर्षे. यांनी दिनांक ३ ऑगस्ट. २०२५ रोजी मोलगी बाजारपेठेत मागणी केलेली लाचेची रक्कम पाचशे रुपये पंचासमक्ष स्विकारली. म्हणूननमिलाप बाळू शिंदे, वय ४४ वर्ष, व्यवसाय- नोकरी, पोहवा/ ९३९, नेमणूक – मोलगी पो. स्टे.(वाहतूक नियंत्रण कर्तव्य) जि. नंदुरबार (वर्ग ३) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोलगी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सापळा व तपास अधिकारी प्रशांत भरते. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार, ASI विलास पाटील, HC देवराम गावीत, HC हेमंतकुमार महाले, HC जितेंद्र महाले,सर्व नेमणूक- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!