भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

खळबळजनक : तोंड दाबून ओढत नेत अल्पवयीन तरुणीवर पाशवी अत्याचार, जिल्हा हादरला..!

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एका नराधम तरुणाने पाशवी अत्याचार केला. रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर तरुणाने बंद घरात नेऊन पाशवी अत्याचार केला. ही घटना चोपडा तालुक्यात घडली.

चोपडा तालुक्यातील सातपुड्यात असलेल्या जिरायतपाडा येथे वास्तव्यास असलेले पीडित कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. याच दरम्यान रात्री ११ वाजेच्या सुमारास
१४ वर्षीय मुलगी
घराबाहेर आली असता
अंधारात दबा धरून बसलेल्या नराधम स्नेहल दिलीप पावरा या तरुणाने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन एका बंद घरात तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

दरम्यान लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेलेली मुलगी परत घरात आलीच नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी रात्रभर जिरायतपाडा गावात शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही.

आई,वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असतांना अंधारात अल्पवयीन मुलगी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की,लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेली असता माझेवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने दोन्ही हातांनी माझे तोंड व हात बांधून जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत पहाटे ४ वाजेपर्यंत पाशवी अत्याचार केला. त्यानंतर संशयित त्या तरुणाने मला घरापर्यंत सोडले अशी आपबिती अल्पवयीन मुलीने सांगितली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून स्नेहल दिलीप पावरा याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शेषराव नितनवरे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!