Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

raver

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील सावदा दुय्यम निबंधक कार्यालयासह राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात, नोंदणी महानिरीक्षकांकडून तपासणी सुरू

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | एक मोठी बातमी समोर आली आहे की, जळगाव जिल्ह्यातील सावदा (ता. रावेर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयासह राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. लोकांची सोय व्हावी म्हणून राज्य शासनाने गतवर्षी मे महिन्यात सुरू केलेल्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ धोरणाचा आधार घेऊन मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची फारशी छाननी न करताच दस्तनोंदणीचा धडाका लावल्याचे चित्र पुढे आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ‘हवेली ४’ आणि पन्हाळा यांसारख्या कार्यालयांमध्ये एका वर्षात ५,००० पेक्षा जास्त दस्तांची असामान्य विक्रमी नोंदणी झाली असून त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ४५९९ दस्तांची विक्रमी नोंदणी झाली आहे.

राज्यात अशी १२ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत की, तिथे असे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. यात मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या मुळे राज्यातील या १२ निबंधक कार्यालयांची स्वतंत्र पथके नेमून नोंदणी महानिरीक्षकांनी तपासणी सुरू केली आहे. या १२ निबंधक कार्यालयांत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा या दुय्यम निबंधक कार्यालयाचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुद्रांक शुल्कमधील घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. त्यांनीच लोकांची सोय व्हावी म्हणून हे धोरण सुरू केले; परंतु अधिकाऱ्यांनी त्यातून सरकारचे नव्हे, तर स्वत:चेच खिसे भरण्याचे काम केल्याचे पुढे आले आहे. या धोरणात मालमत्ता ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या हद्दीत आहे, त्याच कार्यालयात जाण्याची सक्तीची अट रद्द केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात नियमांना बगल व आर्थिक व्यवहार करून दस्त नोंदणी करून देणारे काही अधिकारी होते. त्यांनी या संधीचे सोने केले. पुणे जिल्ह्यातील हवेली ४ या कार्यालयात २०२५ मध्ये ३००३ दस्त झाले होते. त्याच कार्यालयात राज्यात सर्वाधिक ५०८० दस्त नोंदणी या धोरणानुसार झाली. पन्हाळा या दुर्गम तालुक्यात २०२५ मध्ये २१५९ दस्त झाले होते, तिथे ४३४३ दस्तांची नोंदणी झाली. तर जळगाव जिल्ह्यातील सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षभरात ४५९९ नोंदणी झाल्याची माहिती मिळाली असून आकडेवारी नुसार सावदा दुय्यम निबंधक कार्यालय नोंदणीत दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे.

राज्यात १ मे २०२५ ते २० मे २०२६ दरम्यान इतर तालुक्यांतील सर्वाधिक दस्त नोंदणी झालेली कार्यालये-
हवेली, पुणे- ४ : ५०८०
सावदा (जळगाव) : ४५९९
हवेली, पुणे- १८ : ४५९३
पन्हाळा(कोल्हापूर) : ४३४३
नागपूर- ०७ : ४१८५
कर्जत, रायगड : ४०६४
नागपूर- ०५ : ३९५८
हवेली, पुणे- १५ : ३६७५
हवेली, पुणे- २० : ३४७५
हवेली, पुणे- ०५ : ३२५२
फलटण- ०२ : ३२४८
छत्रपती संभाजीनगर : २६५६

‘एक जिल्हा, एक नोंदणी’ धोरणाचा गैरफायदा घेऊन कागदपत्रांची कसून छाननी न करताच बेकायदेशीर दस्तनोंदणी केल्यामुळे महाराष्ट्रातील १२ दुय्यम निबंधक (Sub-Registrar) कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी चौकशीची घोषणा केली असून नोंदणी महानिरीक्षकांकडून (IGR) तपासणी सुरू आहे.

लोकांच्या सोयीसाठी सरकारने एकाच जिल्ह्यातील कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता नोंदणी करण्याची मुभा दिली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी धोरणाचा गैरवापर करत नियमांना बगल देत आर्थिक गैरव्यवहार केले. पुणे जिल्ह्यातील ‘हवेली ४’ आणि पन्हाळा यांसारख्या कार्यालयांमध्ये एका वर्षात ५,००० पेक्षा जास्त दस्तांची असामान्य विक्रमी नोंदणी झाली. दुर्गम भागातील कार्यालयांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात १ मे २०२५ ते २० मे २०२६ दरम्यान तब्बल ४५९९ दस्तांची असामान्य विक्रमी नोंदणी झाली.

या संदर्भात नोंदणी महानिरीक्षकांनी स्वतंत्र पथके नेमून या सर्व कार्यालयांमधील दस्त नोंदणीची सूक्ष्म तपासणी सुरू केली आहे.

दस्त कायदेशीर आहे का, मुद्रांक शुल्क वाजवी भरले आहे का, हे तपासण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांचीच आहे. एकाच कार्यालयात दस्त नोंदणी अवास्तव का झाली, याची चौकशी करण्यात येत आहे. – राजेंद्र मुठे, सहनोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!