Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेर

‘बदली’चा डाव अर्ध्यावर?; मुख्याधिकाऱ्यांचे तात्काळ बदलीचे प्रयत्न अपयशी ! वेगळीच चर्चां

सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज चमू : सावदा नगरपरिषदेतील प्रशासक काळातील कारभारावर सातत्याने होत असलेले आरोप, विकास कामांमधील कथित अनियमितता आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ बदलीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे. बदलीसाठी विविध स्तरांवर हालचाली झाल्याची चर्चा असली, मात्र हे प्रयत्न सध्या तरी यशस्वी ठरले नसल्याची चर्चा रंगली आहे. या प्रयत्नांना तात्पुरता ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर बदलीचा मार्ग मोकळा करण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली करण्यात आल्या. आवश्यक “फिल्डिंग” लावण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र, अपेक्षित पातळीवर मंजुरी न मिळाल्याने तात्काळ बदलीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना सध्या तरी सावदा नगरपरिषदेतच कार्यरत राहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषदेतील अनेक विकासकामे, लेआउट मंजुरी, ऑफलाईन ठेके, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णय याबाबत सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेली कागदपत्रे, नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी आणि वाढती नाराजी यामुळे प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अचानक बदलीच्या हालचाली सुरू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, प्रशासक काळातील निर्णयांची स्वतंत्र चौकशी, आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि नियमबाह्य कामांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे केवळ बदलीचा विषयच नव्हे, तर संपूर्ण प्रशासकीय कारभारच आता तपासणीच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या बदलीचे प्रयत्न रखडल्याची चर्चा असली, तरी पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!