भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ मध्ये नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ; दीड महिन्यात तीन मृतदेह आढळल्याने खडबळ

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || शहरातील वरणगाव रोडवरील एलपीजी पंपाजवळील नाल्यात एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी (ता. १७ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती परिसरात भंगार गोळा करून उदरनिर्वाह करीत होती. स्थानिक नागरिक तिला ‘अय्या’ या नावाने ओळखत असल्याचे सांगितले जाते. या व्यक्तीचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. हा मृत्यू अपघाती आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि मृत्यूच्या परिस्थितीचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दीड महिन्यात तीन ठिकाणी मृतदेह आढळल्याने चिंता

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यात खुनाची एक घटना आणि तीन ठिकाणी मृतदेह आढळल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!