भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

काळवीट प्रकरणात वरिष्ठ वनाधिकाऱ्याशी धक्काबुक्की; वनरक्षक निलंबित, ACF आणि RFO यांच्या उपस्थितीत घडला प्रकार,वन विभागाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह?

चाळीसगाव.मंडे टु मंडे न्युज || गौताळा अभयारण्यातील काळवीट प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, अटक प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी धक्काबुक्की, अश्लील भाषेचा वापर आणि संबंधित वनमजुराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप वनरक्षक विवेक गोकुळ सोनवणे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले असून, आरोप सिद्ध झाल्यास सेवेतून बडतर्फ करण्यासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी Crime & Corruption Control Association (CCCA) ने केली आहे.

काळवीट विक्रीच्या उद्देशाने वनरक्षक आणि वनमजूर यांच्या संगनमताने हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती CCCA ने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर वनविभागाने कारवाई करून काळविटाची सुटका केली. पुढील कारवाईदरम्यान वनमजूर सुभाष शिवाजी कुऱ्हाडे याला कार्यालयात आणण्याची जबाबदारी वनरक्षक सोनवणे यांच्याकडे होती. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (ACF) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) उपस्थित असताना गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे.

वनमजुराने दिलेल्या निवेदनात काळवीट घरी बांधून ठेवण्यास वनरक्षकाने सांगितल्याचा उल्लेख असल्याची माहिती CCCA ने दिली आहे. या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

निलंबनावरच प्रकरण थांबू नये
संबंधित कर्मचाऱ्याविरुद्धचे आरोप, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासून विभागीय चौकशी करावी. आरोप सिद्ध झाल्यास सेवेतून बडतर्फीसारखी कठोर शिक्षा नियमानुसार द्यावी, अशी मागणी CCCA ने केली आहे. या प्रकरणातील आरोप अद्याप चौकशीतून सिद्ध होणे बाकी असून, वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

या घटनाक्रमानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात NCR क्रमांक ११६९/२०२६, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), छत्रपती संभाजीनगर यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४(१)(अ) अंतर्गत विवेक सोनवणे यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!