भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनंदुरबारमहाराष्ट्र

सेवानिवृत्त ७० वर्षीय वृद्धाकडून लाच स्वीकारताना शिक्षकांसह मुख्याध्यापकाला अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आश्रम शाळेतील ७० वर्षीय सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रोत्साहन भत्त्याचे प्रलंबित देयक तयार करून देण्यासाठी वृद्धाकडून लाच स्वीकारताना शिक्षकासह मुख्याध्यापका ला रंगेहात पकडून त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली .

अधिक माहिती अशी की, शासकीय आश्रमशाळा, जांभयी, ता. तळोदा येथून सन २०१४ मध्ये कामाठी या पदावरून सेवानिवृत्त झालेले एक सत्तर वर्षीय वृद्ध कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २००६ ते २०१४ पर्यंतचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक रु. ५४९५६ /- प्रलंबित होते. सदर देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात प्राथमिक शिक्षक, वर्ग ३ भागवत नारायण जगताप हे बक्षिस म्हणून १५०० रु लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक २६ऑगस्ट २०२५ रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.

त्या तक्रारीवरून दिनांक २६;ऑगस्ट रोजी शासकीय आश्रमशाळा, जांभयी ( बोरद) येथे पडताळणी दरम्यान शिक्षक भागवत नारायण जगताप यांनी तक्रारदार यांचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून १५०० रु ची लाचेची मागणी केली  त्याचवेळी मुख्याध्यापक अनील देवराम झाल्टे यांनी सदर लाच रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी चिनोदा फाटा, तळोदा येथे मागणी केलेली १५०० /-रु लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुद्ध तळोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत भरते, पोलीस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी पो.नि.पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पो नि विकास लोंढे, ASI विलास पाटील, HC विजय ठाकरे, HC देवराम गावीत HC हेमंकुमार महाले यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!