ब्रेकिंग : अॅड.उज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती !
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही एक मोठी घडामोड आहे आणि देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. जळगाव येथील एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते.
उज्ज्वल निकम यांनी २०२४ लोकसभा निवडणूक लढवली होती.त्यात त्यांचा पराभव झाला होता.
उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. जळगाव येथील एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते.
महत्त्वाची खटले
- १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण – देशातील सर्वात गंभीर दहशतवादी प्रकरणांपैकी एक, ज्यात त्यांनी आरोपींना दोषी ठरवण्यात मोठी भूमिका बजावली.
- अजमल कसाब प्रकरण (२६/११) – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अजमल कसाब याच्यावर सरकारी पक्षाची बाजू निकम यांनी मांडली.
- प्रशांत पुजारी हत्या प्रकरण
- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण
- कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण – महाराष्ट्रात मोठ्या संतापाची लाट उठवणाऱ्या या प्रकरणात त्यांनी पीडितेला न्याय मिळवून दिला.

