दारू पिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : सोमवार रोजी बंद राहणार राज्यातील सर्व दारूची दुकाने
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दारू पिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिनांक १४ जुलै सोमवार रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व दारू दुकाने बंद राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार महसूल वाढीसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेत असते. राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक महसूल कसा जमा होईल, राज्याच्या विकासासाठी पैसा कसा जमा होईल यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतात. दरम्यान याच महसूल वाढीच्या अनुषंगाने राज्य सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय, हा निर्णय दारुवरील टॅक्स बाबत आहे. दारूवर आकारला जाणारा व्हॅट दुप्पट करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे आणि यामुळे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
शासनाने मद्यावरील कर २५ वाढवल्याने व्यवसायात टक्क्यांची घट होऊ शकते. या विरोधात जिल्ह्यातील मद्य व्यावसायिक, बारचालकांनी उद्या १४ जुलै रोजी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या दिवशी सर्व मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शनिवारी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात २० हजारांच्यावर बार आहे. त्यापासून हजारो कोटी रुपयांचा महसूल महाराष्ट्राला मिळतो. सहा लाख प्रत्यक्ष रोजगार व पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार यातून मिळतो. त्यातच आता संकट म्हणून यावर्षी पंधरा टक्के फी वाढ झाली. आता मद्यावरील करात ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी मद्य व्यवसाय धारकांचा सेल २५ टक्के घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील बार चालकांनी व सर्व मद्य व्यावसायिकांनी सोमवारी व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. व्हॅट वाढवल्याने सरकारचे उत्पन्न कमीच झाले आणि बेकायदेशीर धंदे वाढले. तसेच परराज्यातून अनधिकृतरीत्या अवैध दारू येणे सुरू झाले आहे. व्हॅटमुळे अनेक बार बंद पडले, कित्येक लोक बेरोजगार झाले.
व्हॅट टॅक्सवर स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी १४ जुलै रोजी राज्यभरातील दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार असून जळगाव मध्ये कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार या निर्णयामुळे अधिक वाढला असून सदरील निर्णयाविरोधात आता हॉटेल आणि बार उद्योगातील लोकांमध्ये कमालीची असंतोषाची लाट पाहायाला मिळत आहे. याशिवाय परवाना शुल्क देखील १५ टक्क्यांनी वाढलेले आहे दुसरीकडे उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि यामुळे हॉटेल आणि बार उद्योग पूर्णपणे बेजार झाला असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयाच्या विरोधात आता इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन कडून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
या दिवशी परमिट रूम आणि बार बंद राहणार
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन म्हणजेच AHAR ने टॅक्स मध्ये लागू करण्यात आलेली ही वाढ अवाजवी असून व्यवसायासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे लहान आणि मध्यम दर्जाचे हॉटेल्स आणि बार अस्तित्वातच राहणार नाहीत असाही आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याच करवाढ संदर्भात संघटनेकडून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
मात्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणूनच आता या संघटनेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून येत्या दोन दिवसांनी म्हणजेच १४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच या दिवशी महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. १४ जुलै चा बंद संपूर्ण महाराष्ट्रात असेल आणि या बंद दरम्यान राज्यातील सर्व दारू देणारे सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत. जर या बंद नंतर देखील सरकारकडून जर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देखील संघटनेकडून दिला जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
