ब्रेकिंग : भुसावळ शहर पुन्हा हादरले ! ‘ऑन ड्यूटी’ कर्मचाऱ्याचा खून, सात दिवसात दुसरा खून…
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले. शहरातील मध्य रेल्वेच्या जलशुद्धीकरण (फिल्टर हाऊस) केंद्रात ऑन-ड्युटी असलेल्या प्रसाद यशवंत कुळकर्णी ( ५८, रा. स्टार लॉनजवळ, भुसावळ) या रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी पट्टी टाकून त्यांचा खृन करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आकाश गोरखा यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.भुसावळ शहरात सलग घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनांमध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत.
शहरातील रेल्वे परीसरात असलेल्या कालिंका माता मंदिराजवळ २८ जून रोजी संतोष रघुवीर मनचल (५३) भंगार चोरीच्या वादातून खून झाला होता. तर प्रसाद यशवंत कुलकर्णी हे शनिवारी दुपारी ४ ते २ १२ या शिफ्टमध्ये कर्तव्यावर असताना शनिवारी नऊ वाजेच्या सुमारास कार्यालयात असताना संशयित लोखंडी पट्टीने त्यांच्या डोक्यावर जोर वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्राव झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आरोपी आकाश भानुदास गोरखा ( रा. कवाडे नगर, भुसावळ) हा मनोरुग्ण असून ठाणे येथे त्याची ट्रीटमेंट सुरू असल्याची माहिती मिळत आहे. .भुसावळ शहरातील सात दिवसातील हा दुसरा खून सुन २८ जून रोजी संतोष रघुवीर मनचल (५३) या गॅरेज चालकाचा खून करण्यात आला होता.
प्रसाद कुळकर्णी हे शनिवारी रात्री ४ ते १२ या शिफ्टमध्ये कर्तव्यावर होते. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना संशयिताने तेथीलच लोखंडी पट्टीने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.


