Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

crimejalgaon

वजनाचा घोटाळा : कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये कृत्रिमरीत्या वजन वाढवण्यासाठी कचऱ्यासोबत भरले दगड…जळगाव महापालिकेतील प्रकार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदित्य जीवने यांनी शनिवारी पहाटे भरपावसात दुचाकीवरून तब्बल पाच तास शहरातील स्वच्छता व्यवस्थेची अचानक पाहणी करत प्रशासनाला अक्षरशः धडकी भरवली. या पाहणीदरम्यान डी-मार्ट परिसरात कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये वजन कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी कचऱ्यासोबत दगड भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आयुक्तांनी संबंधित कामगाराला रंगेहाथ पकडत मक्तेदार कंपनीवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले, तर संबंधित स्वच्छता निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
सकाळी सात वाजताच आयुक्त जीवने यांनी स्वतःच्या अंगरक्षकासह दुचाकीवरून शहराच्या विविध भागांची पाहणी सुरू केली. त्यांच्या सोबत स्वीय सहायक गौरव पुराणिक, आरोग्य विभागाचे सहायक अभियंता समीर बोरोले, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि इतर स्वच्छता निरीक्षकही दुचाकीवरून उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या कचरा संकलनात वजनाचा घोटाळा उघडकीस आला आहे. कचऱ्याचे वजन वाढवून महापालिकेची फसवणूक करण्यासाठी चक्क त्यात दगड आणि माती भरल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी स्वतः घटनास्थळी हा प्रकार रंगेहाथ पकडला.या धक्कादायक प्रकारानंतर आयुक्तांनी तातडीने कारवाई करत संबंधित मक्तेदाराला जाब विचारला असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका स्वच्छता निरीक्षकाला (सॅनिटरी इन्स्पेक्टर) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मक्तेदाराकडून प्रति टन दराने बिले काढली जातात, त्यासाठी कचऱ्याचे वजन कृत्रिमरीत्या (दगड-माती टाकून) वाढवण्याचा प्रकार सुरू होता.

शहरातील गणेश कॉलनी, स्वातंत्र्य चौक, आर.आर. विद्यालय परिसर, सुभाष चौक, मेहरूण आणि डी-मार्ट परिसरातील कचरा साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून आयुक्तांनी हे कचरा स्पॉट्स तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाहणी दरम्यान डी-मार्ट परिसरात कचरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरमध्ये कचऱ्यासोबत दगड भरले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. वजन अधिक दाखवून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आयुक्तांनी तात्काळ संबंधित कामगाराला रंगेहाथ पकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित स्वच्छता निरीक्षकाला नोटीस बजावण्याचे निर्देशही दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!