भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : १ ऑगस्ट पासून PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल ; UPI चे नवे नियम ! वाचा..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दररोज तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm किंवा इतर कोणतेही UPI अ‍ॅप्स वापरतायं , तर मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

१ ऑगस्ट २०२५ पासून UPI व्यवहारांसाठी काही नवे नियम लागू होणार आहेत, जे तुमच्या रोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करतील.

NPCI ने लागू केले नवे API नियम
UPI सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी NPCI (National Payments Corporation of India) ने नवे API गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या तांत्रिक नियमांचा वापर बँक व पेमेंट अ‍ॅप्सकडून केला जाईल, पण परिणाम सर्व वापरकर्त्यांवर होईल.

UPI व्यवहारांवरील नवे नियम – १ ऑगस्ट २०२५ पासून लागू
१) दिवसातून केवळ ५० वेळा बॅलन्स चेक करता येणार

UPI अ‍ॅपवरून दिवसात जास्तीत जास्त ५० वेळाच खाते उर्वरित शिल्लक (Balance) तपासता येईल. यामुळे सर्व्हरवरील ताण कमी होईल.

२) लिंक्ड बँक अकाउंट तपासणीवर मर्यादा
दिवसात फक्त २५ वेळा अ‍ॅपला तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्याची तपासणी करता येईल.

३) फेल झालेल्या व्यवहाराचे स्टेटस तपासण्यासाठी मर्यादा

जर व्यवहार अयशस्वी झाला, तर दिवसात फक्त ३ वेळा त्याचे स्टेटस तपासता येईल. आणि प्रत्येक तपासणीमध्ये किमान ९० सेकंदांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

४) आधीच वाढवण्यात आलेय स्पीड
NPCI ने जून २०२५ पासून API रिस्पॉन्स टाइम वाढवला आहे:

यशस्वी व्यवहारासाठी – १५ सेकंद
अयशस्वी व्यवहारासाठी – १० सेकंद
५) व्यवहारापूर्वी खातेदाराचे नाव दिसणार

आता UPI व्यवहार करण्यापूर्वी संबंधित खातेदाराचे नाव वापरकर्त्याला दिसेल, ज्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका कमी होईल.

६) चार्जबॅकवर मर्यादा
डिसेंबर २०२४ पासून, एक महिना (३० दिवस) मध्ये:

फक्त १० वेळा चार्जबॅक करता येईल.
एखाद्या एकाच युजर किंवा कंपनीसाठी ही मर्यादा 5 वेळांची असेल.
यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल आणि सिस्टम अधिक सुरक्षित बनेल.

चार्जबॅक म्हणजे काय?
चार्जबॅक म्हणजे तुम्ही केलेला UPI व्यवहार चुकीचा गेला असेल किंवा फसवणूक झाली असेल, तर त्या व्यवहारासाठी परत पैसे मागण्याची प्रक्रिया. उदा. तुम्ही पैसे पाठवले पण सेवा मिळाली नाही, तर तुमचा बँक किंवा अ‍ॅपकडे पैसे परत मागण्याचा हक्क.

थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे
बॅलन्स चेक – ५० वेळा/दिवस
बँक तपासणी – २५ वेळा/दिवस
फेल व्यवहार तपासणी – ३ वेळा/दिवस
चार्जबॅक – १० वेळा/महिना (प्रत्येक युजर/कंपनीसाठी ५ वेळा)

तुम्ही जर दररोज UPI व्यवहार करत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!