भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी : ६ ते ७ मंत्र्यांना मिळणार डच्चू? कोण आहेत ते मंत्री?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि राजकीय वाद उफाळला. कोकाटेंचे मंत्रिपद जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून अमित शाह यांनी ६-७ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची सूचना दिल्याची चर्चा रंगली. संजय राऊत यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पारदर्शक आणि जनहितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केली असून, त्या प्रतिमेला कुठलाही डाग लागू नये यासाठी भ्रष्टाचार व बेजबाबदारीचे आरोप असंणाऱ्या मंत्र्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर भूमिका घेण्याची शक्यता असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिमा टिकवण्यासाठी मंत्रिमंडळातील बेजबाबदार मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो!

अशा ६ ते ७ मंत्री कोण? असा प्रश्न अनुत्तरित असला तरी
मंत्रिमंडळातील अशा व्यक्तींना वगळण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे “शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि कृषीमंत्री सभागृहात रमी खेळत आहेत,”असा सवाल कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. तर “कामकाज सुरू असताना रमी खेळतात, हे धन्य आहेत!” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत इथिकल कमिटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे.

“अमित शाह यांनी सहा ते सात मंत्र्यांना मंत्रिपदातून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यात माणिकराव कोकाटे यांचे नाव आहे.”या संजय राऊत यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विरोधक आक्रमक आहेत,  आणि भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. हे ६ ते ७ मंत्री कोण? त्यांना डच्चू मिळणार का? कोकाटे बरोबर आणखी कोणा कोणाचा नंबर लागणार? असा प्रश्न निर्माण झाला असून आता अमित शाह यांचा निर्णय काय असतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!