भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट ; माध्यमिक शिक्षण पूर्ण होई पर्यंत ३ भाषा शिकायच्या

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रीचा आदेश रद्द केल्यानंतर या निर्णयाची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली. त्या नंतर केंद्र सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासननिर्णयाची माहिती आम्हाला दिली आहे. मात्र, त्रिभाषा सूत्र कायम राहणार असून त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

भाषा कोणत्या शिकवायच्या तो राज्य सरकारचा निर्णय, भाषेबाबत केंद्र सरकारची बळजबरी नाही. मात्र, तीन भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत. त्यामुळे ६ वी किंवा ७ वी इयत्तेत विद्यार्थी आपणास पुढे शिकायची भाषा निवडू शकतात. केंद्राच्या निर्णयानुसार तीनपैकी दोन भाषा भारतीय असव्यात इतकीच राष्ट्रीय धोरणाची अपेक्षा आहे. त्यामध्ये, या दोन भाषा कोणत्या असाव्यात हा निर्णय सर्वस्वी राज्य शासनाचा आहे, असे केंद्राने स्पष्ट केले.

  • इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती नाही?
  • केंद्र सरकारकडून त्रिभाषा सूत्रावर भूमिका स्पष्ट
  • माध्यमिक शिक्षण पूर्ण होई पर्यंत ३ भाषा शिकायच्या
  • ‘कोणत्या २ भाषा शिकवाव्यात हा राज्यांचा निर्णय’
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!