भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

ब्रेकिंग : जिल्हा खुनानं हादरला..! भांडण पती-पत्नीचे, मात्र गेम झाला मामाचा..

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक खुनाची घटना समोर आली. भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील अयान कॉलनी येथे कौटुंबिक वाद चिघळून पतीने पत्नीच्या मामाचा खून केला, तर पत्नीच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ रोज शुक्रवार रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

मयताचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) असे आहे. तर संबंधित महिलेचे वडील शेख जमील शेख शकर (वय ५२. रा. धुळे) हे जखमी आहेत. संशयित आरोपीचे नाव सुभान शेख भिकन कुरेशी (रा. अयान कॉलनी, भुसावळ) असे आहे.

अनेक दिवसांपासून सुभान शेख भिकन कुरेशी (रा. अयान कॉलनी, भुसावळ) व पत्नी सईदा यांच्यात वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्यानंतर कौटुंबिक तोडगा काढण्यासाठी शुक्रवार रोजी भांडणावर तोडगा काढण्यासाठी रात्री नातेवाइकांनी बैठक घेतली होती. या बैठकीत पती सुभान शेख सह पत्नीचे मामा शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) संबंधित महिलेचे वडील शेख जमील शेख शकर (वय ५२. रा. धुळे) ही सुद्धा सामील होते.

मात्र या बैठकीत वाद चिघळून सुभान शेखने पत्नीचा मामा समद शेख याच्या छाती, मान, पोटावर चाकूने सपासप वार केले. तसेच सासरा शेख जमील यांच्यावरही वार केले. दोन्ही जखमींना तातडीने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी समद शेख यांना मृत घोषित केले. तर शेख जमील यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

सदर घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली, घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनीही पाहणी करून माहिती घेतली. पोलिसांनी आरोपी सुभान शेखला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मृत समद शेख हा हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुले व भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!