ब्रेकिंग : जळगावहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या व्हॅन चा भीषण अपघात, जळगाव जिल्ह्यातील ५ ठार, ४ गंभीर
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगावहून नागपूरच्या दिशेने प्रवास करणारी व्हॅन क्रमांक एमएच ४६ एक्स ३१२० ने समोर चालणाऱ्या दुसऱ्या एका वाहनावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांसह पाच जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले असून या ठार झालेल्यांमध्ये भुसावळचे चार तर मुक्ताईनगरातील एकाचा समावेश आहे.हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बुधवारी रात्री ११:४० वाजेच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील चिखली- रणथम परिसरात
घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून नागपूरच्या दिशेने प्रवास करणारी व्हॅन (एमएच ४६ एक्स ३१२०) ने समोर चालणाऱ्या दुसऱ्या एका वाहनावर जोरदार धडक दिली .
धडक एव्हढी जोरदार होता की या अपघातात वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. व त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये कारचालक साजीद अजीज बागवान (३०, रा. भुसावळ), झुमा सिखधर (४६), तानिया बागवान (४२, रा. पश्चिम बंगाल, ह. मु भुसावळ), संतोष तेजराव महाले (४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. उर्वरित एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
जखमी झालेल्यांमध्ये पंकज दिलीप गोपाळ (२२, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर), दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता), टीना अजय पाटील (४५, रा. भुसावळ) आणि एका अज्ञात महिलेचा समावेश आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे, तर एकाला बुलढाणा येथे हलविण्यात आले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी रात्री उशिरा घटनास्थळ तसेच उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
