भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन

ऐनपुर, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज, विजय के अवसरमल  |गाव पातळीवर विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात येत असल्याची घोषणा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केली त्याचाच एक भाग म्हणून ऐनपूर येथे जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत भाऊसाहेब अकलाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी गाव विकासाची पंचसूत्री समजावून सांगितली गाव खेडे विकसित करावयाचे असतील तर विकास कामांची स्पर्धा निर्माण करू गावाचा शाश्वत विकास करावा लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले सदर सभेचे अध्यक्षस्थन किशोर पाटील यांनी भूषविले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी होऊन सदरचे अभियान दिनांक 31 डिसेंबर 2025 या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे

त्यानंतर या अभियान कालावधीमध्ये शासन निकषाप्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या निकषावर ग्रामपंचायतने केलेल्या कामाच्या आधारावर त्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे शासनाच्या विविध योजना सेवा सुविधा नागरिकांना शेवटच्या घटकापर्यंत गतिमानतेने कशा पोहोचल्या जातील यावर या अभियानामध्ये भर देण्यात आला आहे शासनाचा विकास निधी त्यासोबतच गावातील शाश्वत विकासाची मूलभूत कामे पार पाडण्यासाठी लोक वर्गणी आणि श्रमदान याची जोड देण्यात आली आहे मनरेगा सारख्या क्रांतिकारी योजनेच्या माध्यमातून अभिसरणाची कामे हाती घेऊन गावाची दिशा आणि दशा बदलण्यावर भर देण्यात आला असून यासंदर्भात जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी ऐनपुर तालुका रावेर येथे आयोजित विशेष सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील हाती घ्यावयाची कामे तसेच गावागावात विकासाची स्पर्धा आणि लोक चळवळ निर्माण होण्यासाठी गावातील एकजुट महत्त्वाची असून या स्पर्धेत सहभागी होतात एका बाबीतून अनेक बाबी आणि त्या माध्यमातून शासनाच्या ध्येयधोरणासोबत निकषांची कशी अंमलबजावणी चमत्कारिक केली जाऊ शकते याची उदाहरणासह माहिती त्यांनी सभेस करून दिली गाव पातळीवर विकासाची स्पर्धा करताना इतर विकसित गावांच्या तुलनेत आपल्या गावात त्या विकासात्मक बाबी कशा पद्धतीने राबवल्या जातील यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देऊन गाव स्तरावर विविध उद्योग व्यवसाय निर्माण करण्यावर भर देऊन ग्रामपंचायत कर वसुली 100% करून गावाचा शाश्वत विकास साध्य करता येऊ शकतो असे मार्गदर्शन भाऊसाहेब अकलाडे यांनी केले.

या विशेष सभेसाठी विजय मेढे गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांची उपस्थिती प्रमुख होती
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी गाव स्तरावर ग्रापने केलेल्या नियोजनाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत शीलाताई आर. तायडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिली सभेतील उपस्थितांनी एक मताने हात उंच करून अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प यावेळी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल असेकर यांनी केले या सभेसाठी अडांगळे साहेब विस्तार अधिकारी शेखर वाघ तालुका सहाय्यक कृषी अधिकारी ऐनपुर महाविद्यालयाचे प्राचार्य जे. बी. अंजने, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता पाटील तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशिनाथ शामु पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विकास अवसरमल त्याचप्रमाणे पोलीस पाटील दिपाली तायडे,जगन्नाथ शामु पाटील मा. तंटामुक्त समिती अध्यक्ष,अशोक कचरे माजी सैनिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मंडल अधिकारी तलाठी शरद सूर्यवंशी मुख्याध्यापक कैलास घोलाने ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर, मुस्तफा खान, रंजना कोळी अनिता जैतकर, दिपाली महाजन, दिपाली पाटील, रूपाली अवसरमल ग्राम रोजगार सेवक बाबुलाल तायडे ग्राप कर्मचारी त्याचप्रमाणे विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी प्रगतिशील शेतकरी हरी भिका पाटील पांडुरंग बाजीराव पाटील, आर एस पाटील सर पत्रकार विजय शामराव अवसरमल विजय के अवसरमल, युवा कार्यकर्ते विलास अवसरमल शुभम महाजन गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक गावकरी ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!