भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

ब्रेकिंग : मुक्ताईनगर मध्ये १ कोटी २ लाख रुपयांच्या वर गुटखा पकडला ; अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरापासून जवळ असलेल्या पुर्णाड फाटा नजीक आयशर ट्रक एमएच ४० सीडी ९३५८ या क्रमांकाच्या ट्रॅक मधून लाखो रुपयाचा अवैध गुटखा वाहतूक करीत असताना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून या कारवाईमुळे परिसरात गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा गुटख्याचा साठा कोठून आणला गेला आणि तो कुठे घेऊन जात होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पोलिस तपासात गुटखा तस्कर रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून एक संशईत वाहन क्र. MH 40 CD 9358 या वाहनात अवैध गुटख्याची वाहतुक होत असून सदरचे वाहन हे बन्हाणपुर ते छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वरिष्ट पो. नि. श्री राहुल गायकवाड स्था.गु.शा. जळगाव यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी सदर बाबत पो.नि. आशिष आडसूळ मुक्ताईनगर पो.स्टे. यांना फोन द्वारे माहीती दिली त्या  माहितीच्या आधारावर पोलिसांनी पुर्णाड फाटा येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद दिसणाऱ्या एका आयशर ट्रक (एमएच ४० सीडी ९३५८) ला पोलिसांनी थांबा दिला असता वाहन नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला. तेव्हा आमचे पथकाने त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला व सदरचे वाहन हे सुमारे 11.30 वाजता सारोळा फाटा येथे प्रतीबंधित अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून थांबविले.

वाहन  थांबवून त्या ट्रकची तपासणी केली असता, त्यात गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला. हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रक चालकाकडे गुटखा वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. वाहनातील व्यक्तीला परिचय विचारला असता त्यांनी त्याचे नाव आशिष राजकुमार जयस्वाल रा. ग्राम भमोरी वार्ड नं. 14, देवास, मध्य प्रदेश असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेत अवैध गुटख्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक दोन्हीही जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यां गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या गुटख्याचा साठा कोठून आला आणि कुठे घेऊन जात होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पोलिस  तपासात गुटखा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

खालील प्रमाणे साठा आढळून आला.

1) 40,43,520 रुपये किंमतीचा प्रिमियम सुगंधित पान मसाला एकूण 65 गोण्या प्रत्येक गाणीत 8 लहाण गोण्या प्रत्येक लहाण गोणीत 36 पाकीटे एका पाकीटाची किंमत 216/-

2) 26.13.600/- रुपये किमतीचा प्रिमियम सुगंधित पान मसाला एकूण 50 गोण्या प्रत्येक गोणीत 6 लहाण गोण्या प्रत्येक लहाण गोणीत 44 पाकोट एका पाकीटाची किंमत 198/-

3) 10.10.880/- रुपये किंमतीचा ZN। जाफराणी दर्जा एकूण 13 मोठ्या पिशव्या प्रत्येकी पिशवी मध्ये 5 गोण्या त्यात 8 लहाण गोण्यात एका लहाण गोणीत 36 नग पाकीटे एका पाकीटाची किंमत 54 रुपये/-

4) 53,460/- रुपये किमतीचा ZN2 जाफराणी दर्जा एकूण 9 मोठ्या पिशव्या प्रत्येकी पिशवी 6 लहाण गाण्यात एका लहाण गांणीत 45 नग पाकीटे एका पाकोटाची किंमत 22 रुपये/-

5) 25,00,000/- रुपये किंमतीची एक आयशर ट्रक क्र MH 40 CD 9358 जु.वा. कि.अं.

6) 12,000/- रु कि.चा एक SAMSANG कंपणीचा मोबाईल फोन त्यात जिओ कंपणीचे सिम क्र. 8889147271

असा क्र. असलेला त्याचा IMEI NO. 1) 350973425216243, 2) 354224545216242 असा असलेला जु.वा.कि.अं.

असा एकुण 1, 02,33,460 ( एक कोटी दोन लाख तेहतीस हजार चारशे साठ) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.

या कारवाईत वरिष्ट पो. नि. श्री राहुल गायकवाड स्था.गु.शा. जळगाव पो.नि. आशिष आडसूळ मुक्ताईनगर पो.स्टे., मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. जयेश पाटील स्था.गु.शा. जळगाव यांचे कडील पथक पोउप निरी सोपान गोरे, पो.हे.कॉ सलीम सुभान तडवी, पो.कॉ. छगन जनार्धन तायडे, पो.कॉ.रतन धोंडीराम गिले पो.अं.  मयुर शरद निकम, चा.पी.हे.कां.  भरत पाटील, सर्व नेम स्थागुशा जळगाव तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडोल पथक सपोनि जयेश पाटील, पो.हे.कॉ. भाऊराव रमेश घेटे, पो.ना. असिम नजीरखा तडवी, पो. अं. रविंद्र विष्ठ्ठल धनगर, पो.अं.  संदीप धनगर तसेच दोन शासकीय पंच 1) डिगंबर नारायण पाटोल, व 2) रुपाली गोविंदा शिके दोन्ही नेम वन विभाग मुक्ताईनगर असे मुक्ताईनगर पो.स्टे. येथे हजर असतांना पो.उप निरी. सोपान गोरे यांनी भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!