हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले, पाण्याच्या पातळीत वाढ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानंतर हतनूर धरणाचे ४१ पैकी १८ दरवाजे बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णपणे उघडण्यात आले. यामुळे सुमारे एक लाख १६ हजार २५७ क्यूसेकने विसर्ग होत असून तापी नदी खळबळून वाहत असल्याने नदीला पूर आला असून तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याचे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्याचा निर्णय घेतला. हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर शेळगाव बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने आणि तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत.

