सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे वृक्षारोपण
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी .जी . हायस्कूल .व कनिष्ठ महाविद्यालयात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब ,शीसम ,पळस इत्यादी उपयुक्त रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक प्रा. श्री. एन .जे. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .श्री. शैलेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ शिक्षिका प्रा. सौ. के. ए. नाईक ,क्रीडा शिक्षक प्रा. श्री. जे .के. पाटील ,उपशिक्षक प्रा.श्री .व्ही .व्ही. पाटील, प्रा. श्री. पी .एन .पाटील, प्रा.सौ. पी .के. महाजन , प्रा.सौ .ए . ए.काकडे. श्रीमती डी .आर. पाटील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले.
