भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

Breaking : नगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग : प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिका निवडणुकाच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकाव्यारे जाहीर करण्यात आला असून यामुळे निवडणुका येत्या काळात लवकरच लागू शकतात याचे संकेत मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ वरणगाव, रावेर, सावदा, फैजपूर, यावल, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा तसेच नवनिर्वाचित नशिराबाद नगरपालिका येथे निवडणुका होणार आहेत.

ओबीसी आरक्षण आणि कोरोना विषाणूच्या महामारीमुळे मार्च २०२० पासून ते डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकांमधील सर्वात महत्वाचा घटक असणार्‍या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार राज्यातील अ, ब आणि क वर्गात येणार्‍या नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यात अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे. यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल. जिल्हाधिकारी याला २५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील.

तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील. तसेच ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर पहिल्यांदा जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अर्थात, यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार असून ते याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे. यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल. तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील. यामुळे निवडणुका एप्रिलचा अखेरचा आठवडा अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्या बघता निवडणुकांचे तारखा कधी घोषित होतात हे बघणं महत्त्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!