भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावपाचोरा

ब्रेकिंग : शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेत शिक्षणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील शाळेत २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अधिक वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र महाले हे सध्या पाचोरा शहरात ते वास्तव्यात होते आणि पाचोरा शहरातील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका वर्ग खोलीत टोकाचे पाऊल उचलत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला .

घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शिक्षकाने शाळेत आत्महत्या केल्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यी तसेच सहकारी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!