भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर गुन्हा; ३७ लाखांहून अधिक रकमेच्या बेकायदेशीर वसुलीचा आरोप

सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | बेकायदेशीररीत्या चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन कर्जदाराची वडिलोपार्जित शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा तसेच तब्बल ३७ लाख ७४ हजार ३२५ रुपयांची अवैध वसुली केल्याचा आरोप असलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन जणांविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सहकार अधिकारी प्रदीप माधवराव महाजन यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील चुडामण नारायण जंगले आणि त्र्यंबक नारायण जंगले यांनी शेती लागवडीसाठी संशयित आरोपी अशोक जगन्नाथ पाटील (७५) आणि राजेंद्र जगन्नाथ पाटील (६०) यांच्याकडून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.


आरोपानुसार, या कर्जावर संशयितांनी बेकायदेशीररीत्या चक्रवाढ व्याज आकारले. तसेच कर्जदाराची कौटुंबिक वडिलोपार्जित शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, कर्जदाराने मूळ रक्कम व व्याज मिळून ३३ लाख ३९ हजार ५९७ रुपये परत केले होते. तरीही कागदपत्रांमध्ये फेरफार करून तसेच केळी पिकाच्या उत्पन्नाची गुप्तपणे विक्री करून एकूण ३७ लाख ७४ हजार ३२५ रुपयांची अतिरिक्त बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.


या आदेशानुसार सावदा पोलिस ठाण्यात गु.र.नं. २१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!