भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर बसस्थानकातील बीएसएनएल लँडलाईन फोन नादुरुस्त; नागरिकांचे प्रचंड हाल

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथील बसस्थानकातील बीएसएनएलचा लँडलाईन फोन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने प्रवासी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकावर तातडीने संपर्क साधण्याची गरज भासल्यास लँडलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


विशेषतः ग्रामीण भागातून येणारे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना बसस्थानकाशी संपर्क साधता येत नसल्याने बसच्या वेळा, चौकशी व इतर आवश्यक माहिती मिळविण्यात अडचणी येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीतही ही सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनी सेवा अखंडित सुरू राहणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणेकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

बीएसएनएलकडे लँडलाईन सेवेसाठी तक्रार नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध असली तरी स्थानिक स्तरावर बिघाड तातडीने दुरुस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर बसस्थानकात यापूर्वीही मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत आता लँडलाईन सेवा बंद पडल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
नादुरुस्त लँडलाईन तात्काळ दुरुस्त करून बसस्थानकातील दूरध्वनी सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!