जळगावात माजी खासदार, आमदारांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, राजकीय क्षेत्रात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चिथावणीखोर भाषण आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बेकायदा घुसून पोलिसांना धक्काबुक्की केल्याने माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकरी जनआक्रोश मोर्चा प्रसंगी हा प्रकार घडला.याप्रकरणात १० कलमान्वये लावली आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बुधवार रोजी शेतकरी मोर्चात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी जिल्हाधिकारी यांनी नाकारल्याने माजी खा उन्मेश पाटील,बच्चू कडू यांच्या सह मोठा जमाव पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घुसला.यावेळी गदारोळ उडाल्याचे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू, माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह १३ जणांविरुद्ध जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

