भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

बऱ्हाणपूर – अंकलेश्वर-राज्य मार्गावर धावत्या आयशर ट्रकने घेतला पेट

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल तालुक्यातील सांगवी ते हिंगोणा दरम्यानच्या रस्त्यावर धावत्या आयशर ट्रकने पेट घेतला. ही घटना बुधवार रोजी संध्याकाळी घडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने त्यांनी तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला बाजूला केला व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आग विझवली यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रक जळून जाळून गेला आहे.

यावल तालुक्यातील सांगवी फैजपूर दरम्यान
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सांगवी बुद्रुक गाव ते हिंगोणा या गावाच्या दरम्यान शंतनू पेट्रोल पंपा जवळ साहेबराव बडगुजर (रा. राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) हे आयशर ट्रक (क्रमांक एम. एच. 14 सी. वाय. 7917) घेऊन जात असताना त्यांच्या धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली आयशर ट्रक थांबवली. घटनास्थळी तातडीने आकाश सोनवणे, अजय मेघे, कशीश तायडे, विजय मेघे, सागर तायडे व शंतनू पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि तातडीने ही आग विझवली. यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र आग लागल्यामुळे आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!