भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

यावल तालुक्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; चार महिलांची सुटका

फैजपूर.मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह एका संशयिताविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, फैजपूर, यावल पोलिस ठाणे आणि निंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

कारवाईपूर्वी पोलिसांनी एका व्यक्तीला पंटर म्हणून संबंधित ठिकाणी पाठवून माहितीची खातरजमा केली. माहितीची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी रात्री सुमारे ८ वाजता दुमजली घरावर छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर तेथे अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार महिलांची सुटका केली.


पोलिसांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला मूळच्या कोलकाता, पश्चिम बंगाल येथील असून सध्या त्या परिसरात राहत आहेत. तर एक महिला भुसावळ येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिलांची चौकशी सुरू असून, कारवाई मागील अन्य बाबींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तपासानंतर या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या नियोजनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अकलूद परिसरातील सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!