भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

राज्यातील शाळांच्या वेळात पुन्हा बदल, या शैक्षणिक वर्षात शाळांना किती दिवस सुट्ट्या? महत्वाची माहिती

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सर्व शाळांची वेळ पुन्हा बदललेली आहे. शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये ५८ दिवस रविवारच्या सुट्ट्या समाविष्ट असून इतर सणासुदीच्या, दिवाळीच्या आणि उन्हाळी अशा एकूण ७६ सुट्ट्या राहणार आहेत.

त्यात दिवाळीच्या सुट्ट्या १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत असतील तर उन्हाळी सुट्ट्या २ मे २०२६ ते १३ जून २०२६ या काळात राहतील. दरम्यान, जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारात २ सुट्ट्या असतील.

कसे असणार शाळांचे वेळापत्रक?
जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी १०.३० (साडेदहा) ते सायंकाळी ५ (पाच) वाजेपर्यंत अशीच राहणार आहे. तसेच अर्ध्या वेळेची शाळा सकाळी ९ (नऊ) वाजेपासून ते दुपारी १.३० (दीड ) वाजेपर्यंत भरणार आहे.
या कालावधीत काही शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत भरवल्या जाणार .

राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांबाबत
राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळाची नियमित वेळ सकाळी १०.३० (साडेदहा ) ते सायंकाळी ५ (पाच) अशीच राहणार आहे.
मात्र उर्दू माध्यमातील अर्ध्या वेळेची शाळा ही सकाळी ९ (नऊ) ते दुपारी १२.३० (साडेबारा) वाजे पर्यंतचं भरवली जाणार असल्याचे शिक्षण विभागा कडून सांगण्यात आलं आहे.

शिक्षण विभागाकडून असंही सांगण्यात आलं आहे की, रमजानच्या महिन्यात असणाऱ्या उपवासानिमित्त त्या काळात उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी ९ (नऊ) ते दुपारी २.३० (अडीच) वाजे पर्यंत या वेळेत भरतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!