सीबीआय असल्याचे सांगत सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ३१ लाख ५० हजारांची फसवणूक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत चाळीसगाव येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची एका अज्ञात व्यक्तीने तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव येथील प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, फुले कॉलनी, चाळीसगाव) या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला १६ ते २३ जून २०२५ या कालावधीत सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीने शिंपी यांच्याशी मोबाइलवरून व्हॉट्स ॲप व्हिडीओ कॉल आणि चॅटद्वारे संपर्क साधून या भामट्याने शिंपी यांना
सीबीआय आणि दिल्ली पोलिस बोलत असल्याचे भासवून,
‘तुमचे बैंक खाते मनी लॉड्रिंगसाठी वापरले जात आहे,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला, त्याने शिंपी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रकाश शिंपी यांनी या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


