भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये गुरे कोंबून नेत असलेला कंटेनर पकडला, गुरे तस्करांवर मोठी कारवाई

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये कत्तली साठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कंटेनर वर मोठी कारवाई करण्यात आली. कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणाऱ्या कंटेनरवर मुक्ताईनगर येथील शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत एक कंटेनर पकडण्यात आला असून कंटेनरमधील सोडवलेली जनावरे अंतुर्ली येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहेत. याबाबत कंटेनर मालक आणि वाहनचालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे शहरप्रमुख गणेश टोंगे यांना संशयास्पद कंटेनर शहरातून जात असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी आपले सहकारी गौरव नाईक , गौरव धामधरे, ओम् भोई, ओम् मराठे, भूषण माळी, मंगेश माळी, अक्षय निंबाळकर, रोहित भालेराव, अजय नाईक, आदित्य कोळी
या सहकाऱ्यांसह तात्काळ कारवाई करत कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली. तपासणीत कंटेनरमध्ये म्हशींची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. या प्राण्यांना कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय आहे. ही माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला. संबंधित जनावरे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील गोशाळेत हलवण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे मुक्ताईनगर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, जनावरांच्या तस्करीप्रश्नी नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या या तत्परतेमुळे अनेक निरपराध जनावरांचे प्राण वाचले असल्याने शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. कंटेनर मालक आणि वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत राजकुमार चव्हाण करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!