भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातात यशवंत भास्कर सोनवणे (वय अंदाजे ४०) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. २६ जून रोजी घडली. हा कामगार भुसावळ तालुक्यातील फेकरी या गावातील रहिवाशी असल्याने या घटनेमुळे फेकरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १२ वर्षांपासून यशवंत सोनवणे हे कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्या अधिपत्याखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ५०० मेगावॅट युनिटमधून १५ कोळशाच्या डब्यांच्या गाड्या २१० मेगावॅट युनिटमध्ये हलविण्याचे काम सुरू होते. यावेळी रेल्वे लोकोमोटिव्हद्वारे रिलीव्ह करताना सोनवणे हे कपलिंग सेटिंगचे काम करत होते. दरम्यान, अचानक पाण्याचा फवारा सुरू झाल्यामुळे चालकाचे लक्ष विचलित झाले व याच वेळी सोनवणे हे लोको आणि डब्यांमध्ये अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर सोनवणे यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, दोन बहिणी व वडील असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!