भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

रेल्वे प्रवाशांना दिलासा ! चार रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेने भुसावळ, जळगाव, मार्गावरून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने प्रवाशांना सोईचे होणार आहे. या साप्ताहिक रेल्वे आता सप्टेंबर पर्यंत धावणार आहे.

दर शुक्रवारी धावणाऱ्या गाडी क्रमांक ०९०४९ दादर-भुसावळ व गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ-दादर साप्ताहिक रेल्वे आता २६ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. तर सोमवार, बुधवार, शनिवारी धावणाऱ्या गाडी क्र. ०९०५१ दादर-भुसावळ व गाडी क्र. ०९०५२ भुसावळ-दादर त्रि-साप्ताहिक रेल्वेला आता २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या रेल्वेंना जळगाव थांबा आहे.

तर भुसावळ थांबा असलेल्या गाडी क्रमांक ०४१५६ उधना-सुभेदार गंज ही दर मंगळवारी धावणाऱ्या रेल्वेला ३० सप्टेंबर पर्यंत तर गाडी क्र. ०४१५५ सुभेदारगंज-उधना ही दर सोमवारी धावणाऱ्या रेल्वेला २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच मध्य रेल्वेने बडनेरा-नाशिक रोड गाडीच्या धावण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी ०१२११ बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी ३० जूनपर्यंत धावणार होती, तिचा कालावधी वाढवून १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या असणार आहे. गाडी ०१२१२ नाशिक रोड- बडनेरा जंक्शन अनारक्षित नियमीत विशेष गाडी सुद्धा ३० जूननंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालवण्यात येणार असून, तिच्याही ९२ फेऱ्यांचे नियोजित आहे. या गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्याने प्रवाशांना फार मोठे सोईचे होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!