नवविवाहित तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या !
जळगाव (प्रतिनिधी)। खेडी बु.येथील नवविवाहित तरुणांने रात्री राहात्या घरात छताला दोरी बाधुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निकेश तिरसिंग राजपूत (वय २७) मूळ रहिवासी कुसुबा ह.मु.खेडी बु. येथे भाड्याच्या खोलीत पत्नी मीना सह राहात होता. निकेश आणि मिनाचे दोन महिन्यापूर्वीच जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील देवळात खेडी बु. येथे लग्न झाले होते, दि.१२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निकेश घरी आल्यानंतर टेन्शन मध्ये होता. कोणाला काही न सांगता मागच्या खोलीतील दाराची आतुन कडी लाऊन रात्री १ वाजेच्या सुमारास घरातील छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मीना यांनी शेजारी व नातेवाईक यांना आरडाओरडा करुन बोलवले असता निकेश ला रात्री १:३० च्या सुमारास देवकर काँलेज येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी निकेशला मृत्यू घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


