भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

मन्यारखेड्यात वैशाख स्नानासाठी भाविकांची गर्दी; तीर्थकुंडांचे विधिवत उद्घाटन

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | येथील नशिराबाद (मन्यारखेडा) विश्वातल एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिरात वैशाख स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिर परिसरातील सर्व तीर्थकुंडात स्नान करण्यासाठी हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या सर्व तीर्थकुंडांचे विमोचन श्री गुरु ब्रह्मावधूत डॉ. स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. चारधाम, अष्टभुवैकुंठ, १२ ज्योतिर्लिंग तसेच ६८ तीर्थक्षेत्रांतील पवित्र माती व जल या कुंडात सोडण्यात आले. त्यानंतर हे कुंड भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, आजच्या दिवशी हजारो भक्तांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला.

मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २८ मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बद्रीनाथ धाम (हिमालय) येथील माजी धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्या मार्गदर्शनाखाली बद्रीनाथ भागवत कथा आज पूर्ण झाली. तसेच कीर्तन सप्ताहात संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा सादर केली.

आज दि. १० एप्रिल) रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्री बद्रीनाथ मंदिर संस्थानचे गादीपती प.पू. स.गु. श्री मयूरगोविंदजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर बद्रीविशाल भंडाऱ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!