भाकरी फिरणार! सावदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी लेवा समाजाची सुन मैदानात उतरणार !
मुख्य संपादक– भानुदास भारंबे
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून सावद्याच्या राजकारणात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नव्या राजकीय गणितांची मांडणी सुरू झाली आहे. काय घडणार या बाबत मोठी उत्सुकता वाढली आहे. सावदा नगराध्यक्षपद एससी राखीव झाल्याने त्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बाजूने इच्छुकांच्या चाचपणीसह मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचाही प्रयत्न सुरु झाला आहे. नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने इच्छुकांच्या इच्छा – आकांक्षावर पाणी फिरले आहे. नवोदित आणि तरुण इच्छुकांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आगामी निवडणुकीत या आरक्षणावरून राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची असल्याची खात्री लायक माहिती “मंडे टू मंडे न्युज नेटवर्क” ला मिळाली आहेत.
सावदा नगरपरिषद निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गासाठी राखील झाले आहे. इच्छुकानी शहरातील विविध घटकांशी संवाद साधताना व्यक्तिगत भेटीगाठींकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या घडामोडीमध्ये सावदा पालिकेतील राजकारणाला कलाटणी मिळणार हे मात्र नक्की.. यंदाच्या निवडणुकीत अनिसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या जागेसाठी लेवा समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमाणपत्र असलेली सून नगराध्यक्ष पदाची प्रबळ पक्षाकडून उमेदवार होणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. या संदर्भातील चाचपणी करण्यात येत असून मोठ्या रणनीतिक घडामोडी पडद्या आड घडत असून गणित जोडली जात असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून ‘’मंडे टू मंडे न्युज’’ ला मिळाली आहे.
शहराचा सामाजिक विचार केला असता लेवा बहुल मतदारांची संख्या अधिक असल्याने जरी नगराध्यक्ष पद अनिसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या असलेले तरी लेवा समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमाणपत्र असलेली सून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास सावद्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. सर्व सूत्र जुडली तर हेच सत्य योग्य वेळी समोर येणार असल्याचे संकेत मिळत असून लेवा पाटीदार समाजाची सून मैदानात उतरणार आहे. या महिला कोण? हे लवकरच समोर येणार आहे.
माहितगार राजकीय व्यक्तीशी चर्चा केली असता या गोष्टीला दुजोरा मिळाला. या सर्व घडामोडी बघता पडद्या मागे बरीच कूटनीतिक रणनीती आखली जात असून त्यासंदर्भातील गणितांची मांडणी सुरू आहे.
तूर्त एवढेच….
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
