भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

पुरनाड वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन : अध्यक्षपदी बापू ठेलारी, उपाध्यक्षपदी मुकेश ठेलारी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड वस्ती येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन नुकतेच पार पडले. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी बापू मका ठेलारी यांची तर उपाध्यक्षपदी मुकेश गणेश ठेलारी यांची निवड एकमताने करण्यात आली. सचिवपदी सुरेश वामन पाटील यांचीही सर्वानुमते निवड झाली.


या वेळी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रियेत परस्पर सहकार्य, एकोपा आणि शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. निवडीनंतर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थी विकास आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी नव्याने निवड झालेल्या समिती सदस्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!