भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

दिवाळी नंतर उडणार निवडणुकांचा बार? केव्हा जाहीर होणार निवडणुकींचा कार्यक्रम?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकींचा बार पुढील महिन्याच्या अखेरीस उडण्याची शक्यता आहे. मोठ्या खंडानंतर ग्रामीण भागात निवडणुकांचा धुरळा उठणार असल्याने कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांमध्ये सळसळता उत्साह असणार आहे.

या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा बिगुल वाजेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दर २० दिवसांच्या कालावधीने निवडणुका होतील असा दावा सूत्रांनी केला आहे. या मोठ्या अपडेटमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. कारण दिवाळीनंतर लागलीच या निवडणुकींची लगबग सुरू होईल. यंदा प्रचाराला किती दिवस मिळतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!