“लाडकी बहिण” की “घुसखोर लाडके भाऊ” १२ हजार ४३१ पुरुष लाभार्थी, २४ हजार सरकारी कर्मचारी लाभार्थी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपासूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाली . तेव्हा पासून ही योजना चर्चेत आहे. दरमहा पात्र लाभार्थी महिलांना राज्य सरकार कडून १५०० रुपये दिले जातात. ही योजना फक्त पात्र महिलांसाठी असताना या योजनेचा लाभ पुरुषांनीही घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. खुद्द सरकारकडूनच ही माहिती , माहिती अधिकारामध्ये योजने द्वारे धक्कादायक माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे. यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून हटविण्यात आली आहेत.
त्याचसोबत एकूण ७७ हजार ९८० अपात्र महिला लाभार्थ्यांनाही यादीतून हटवलं आहे. विशेष म्हणजे त्यात २४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून दिलेल्या पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही! या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसन माहिती दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर दिलेल्या उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. आता मात्र सरकारी आकडेवारीतून नेमकी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे या पुरुष व महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करून अनुक्रमे १२ व १३ महिने योजनेचा लाभ पदरात पाडून घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच, जवळपास वर्षभर दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत होते. यातून सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी २४.२४ कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड बसला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ‘सरकारी लाभार्थ्यां’ची संख्या २४०० इतकी असून त्यांची नावेदेखील यादीतून हटवण्यात आली असून त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात आल्याचं महिला व बाल कल्याण विभागानं सांगितलं आहे. मात्र अद्याप कोणत्याही व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या लाभाच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.


