प्रवाशांसाठी मोठी बातमी : “या” तारखे पासून दररोज सुरू होणार जळगाव-मुंबई विमानसेवा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक महत्वाची बातमी जळगाव जिल्ह्यातील व परिसरातील प्रवाशांसाठी आहे. २६ ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा असते मात्र आता ही जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. त्या मुळे आता प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. यापैकी अलायन्स एअर कंपनीकडून आठवड्यातून मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर जळगावहून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी अशी चार दिवस विमानसेवा दिली जात होती. परंतु मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या या उत्तम प्रतिसादामुळे २६ ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दोन्ही बाजूने दररोज सुरू होणार आहे.
अशी असेल वेळ
मुंबई-जळगाव विमान सेवा
उड्डाण वेळ: सायंकाळी ७:१० वाजता
आगमन वेळ: रात्री ८:२५;वाजता
जळगाव-मुंबई विमान सेवा
उड्डाण वेळ: रात्री ८:५० वाजता
आगमन वेळ: रात्री १०:१० वाजता

