आ. अमोल जावळे यांच्या पुढाकाराने बामणोद येथे बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच भांडे वाटप
विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगार योजने अंतर्गत बामणोद, म्हैसवाडी, विरोदा, आमोदा, पिंपरुड, या गावातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मोफत गृहउपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्यात आला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण दिसून आले.
या वेळी,शरद भाऊ महाजन , प्रभाकर सोनवणे , हिरालाल व्यंकट चौधरी , विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, डॉ नरेंद्र कोल्हे, जयश्री चौधरी, भारती पाटील, उमेश पाटील, भरत पाटील, शाम महाजन, नरेंद्र चौधरी, उमेश बेंडाळे, अनंत नेहते, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, कलीमा सायबु तडवी आदी उपस्थित होते.
