मानेगाव फाटा ते मानेगाव रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा … ग्रामपंचायत कडून आमरण उपोषणाचा इशारा
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव फाटा ते मानेगाव पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मृत्यूचा सापळा बनला आहे सदरचा रस्ता १५ रस्ता १५ दिवसात तयार न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा मानेगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.लीना पाटील यांनी निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
मुक्ताईनगर पासून तब्बल ५ ते ६ किलोमीटर अंतर असलेल्या मौजे मानेगाव फाटा ते बजरंग बली मंदीर मानेगाव पर्यंत रस्ता मंजूर असून सुध्दा ठेकेदार रस्त्याचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शाळकरी मुले तसेच गावकरी तसेच वाहनधारक यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. सदरचा रस्ता हा अत्यंत दूरअवस्था झालेला आहे तसेच गावाला येणारा हा मुख्य रस्ता असून या व्यतिरिक्त दुसऱ्या पर्यायी रस्त्याची सुद्धा यापेक्षाही दुरावस्था झाली असून या रस्त्यांवर जिवीत हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच त्यावर प्रवास करणे व पायी चालणे देखील कठीण झाले आहे असे असतांना सुद्धा जीया रस्ता तयार करण्यात आलेला नाही . हा रस्ता गेल्या सहा वर्षांपासून अत्यंत खराब झाला असून शेवटच्या घटका मोजत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत मानेगाव सरपंच यांनी संबंधितांची संपर्क साधला असता अद्याप यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही.
गेल्या महिन्यात याच रस्त्यावर खड्ड्यांमुळे गाडीवरून खाली पडून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आता पावसाळ्यात शाळेची लहान मुले आणि मुली मुक्ताईनगर ला येजा करीत असतात सायकल किंवा मोटरसायकल स्लिप होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कामानिमित्त येजा करणाऱ्या लोकांना देखील प्रचंड त्रास आहे.
रस्त्याचे कामं लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा या माध्यमातून गावाकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला असून
सदरचा रस्ता १५ दिवसाच्या आत करून मिळावा, अन्यथा गावातील नागरिक व ग्रामपंचायत मानेगाव कमेटी आमरण उपोषण करतील असा इशारा सौ. लिना संभाजी पाटील सरपंच, मानेगाव ग्रामपंचायत ता. मुक्ताईनगर यांनी जिल्हा अधिकारी जळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सो. जि प जळगाव. अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाय. तहसिलदार मुक्ताईनगर, पोलिस निरीक्षक मुक्ताईनगर पोलिस स्टेशन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
