भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता! सहा महिन्यांपासून बंद असलेले कर्की गावातील CSC सेंटर आयडी तत्काळ सुरू

मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला सीएससी (CSC) सेंटरचा आयडी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या तत्परतेमुळे अखेर सुरू करण्यात आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या सहा महिन्यांपासून सीएससी सेंटरचा आयडी बंद असल्याने विविध शासकीय ऑनलाइन सेवा मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, या प्रश्नाची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी तत्परता दाखवल्याने सेंटरचा आयडी पुन्हा सुरू झाला आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या तत्पर कार्यवाहीचे ग्रामस्थांकडून कौतुक!
नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल जिल्हाधिकारी घुगे साहेबांचे आभार व्यक्त केले जात आहेत. प्रशासनाने अशाच प्रकारे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!