भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हा परिषद सीईओं मिनल करनवाल यांची बदली : करिश्मा नायर जळगावच्या नव्या सीईओ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी । राज्यातील प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नाशिक येथील करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांना गती दिली होती. आता त्यांच्यावर राज्य सरकारने महत्त्वाची अतिरिक्त धुरा सोपवली आहे. मुंबई येथील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) च्या प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व आता मिनल करनवाल करणार आहेत.


तर दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त नाशिक महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विराजमान होणार आहेत. नायर यांनी नाशिकमध्ये काटेकोर व शिस्तबद्ध कार्यपद्धतीने आपला ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या प्रशासकीय बदल्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनात आता नव्या दमाने कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच या दोन्ही महिला अधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!