क्राईमभुसावळ

निर्दयतेने ट्रकांमध्ये कोंबून गायींची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले, दोन गाई व एका वासराचा मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निर्दयतेने व क्रुरतेने दाटा दाटी करून दोन ट्रकांमध्ये सुमारे २५ गायींची सावदा मार्गे अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रका भुसावळ शहरातील भुसावळ फैजपूर रस्त्यावरील भोरटेक जवळ बेकायदेशीरित्या गायींची वाहतूक होत असतांना त्या आडवून तब्बल २५ गायींना गोरक्षकानी जीवदान दिले आहे. यात दोन गायींसह एका वासराचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार दी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कत्तलीच्या उद्देशाने गायींची अत्यंत निर्दयतेने दोन ट्रकमधून वाहतूक होत असल्याची माहिती रावेर व यावल तालुक्यातील गो रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकांनी त्यांना हुलकावणी देत ट्रक सुसाट वेगाने भुसावळच्या दिशेने निघाला होता. ही बाबत भुसावळातील गो रक्षकांना कळवण्यात आल्यानंतर भोरटेक जवळ  सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दोन ट्रक गो रक्षकांच्या उपस्थितीत अडवण्यात आल्या.

भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन ट्रकची पाहणी केली असता त्यात अत्यंत दाटा दाटीने व निर्दयतेने गायींची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.गो रक्षकांनी भुसावळ पोलिस वसाहत मध्ये आणल्यावर  गोरक्षकांची गुन्हा दाखल करून घेण्यासाठी खूप फिरफिर करावी लागली. दोन्ही ट्रक अकलूद येथील आसाराम बापूजी आश्रमात नेण्यात आल्या आहेत. गो तस्करीच्या गाड्या चेक पोस्ट किंवा पोलिस चौकीजवळून पास होतेच कशी इथेच शंकेची पाल चुकचुकते.

दरम्यान, संशयीतांनी गायी पालनासाठी नेत असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्ष पाहणीत गुरांची चारा-पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही तसेच अत्यंत क्रुरतेने त्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. क्रुरतेने गुरांची वाहतूक केल्यानंतर दोन गायींसह एका वासराचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!