क्राईमरावेर

पाच हजारांची लाच मागणाऱ्या रावेर तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागणाऱ्या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांचेवर निंभोरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ग्रामविकास अधिकारी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावातील रहिवाशी असून त्यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी शासकीय कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर ८, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला आदी. कागदपत्र काढून देण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी जावळे यांच्या कडे केली. परंतू शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रुपये लाच मागितली होती, तक्रारदारांना लाच द्यायची नसल्याने त्याच दिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने तळजोडी अंती ५ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी हा पसार झाला आहे.

सदरची कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!