नायगावात दुर्गा देवीचे विसर्जन उत्साहात साजरे
नायगाव. ता .मुक्ताईनगर. मंडे टू मंडे न्यूज. विठ्ठल कोळी ||मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गा देवीचे विसर्जन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यानिमित्ताने गावातील मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्गा देवीच्या विसर्जनानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी जय बजरंग मित्र मंडळ, युवा गुर्जर भद्र काली मंडळ या दोघ मंडळाच्या वतीने बँड च्या गजरात तसेच रामराज्य दुर्गा मंडळ यांनी श्रीराम भजनी मंडळ, नायगाव यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
सायंकाळी 5 वाजता दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. भजनी मंडळाच्या पखवाजाच्या तालावर व भक्तिमय वातावरणात सोहळा उत्साहात पार पडला.गावातील नागरिक व भाविक महिलांनी या दिंडी सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. दुर्गा देवीला भावपूर्ण निरोप देताना परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात देवीच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.


