भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

सौ. सुनिता महाडिक यांची “समाजरत्न” पुरस्कारासाठी निवड

अंबरनाथ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नवस्वराज्य न्यूज युवा व ग्रामीण पत्रकार संघ यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजरत्न व समाजभूषण हे भव्य पुरस्कार प्रदान सोहळे वर्धा येथे उत्साहात पार पडले. समाजातील लोकाभिमुख, समाजकार्याला आयुष्य वाहिलेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात लाईव्ह नवविचार न्यूज या वृत्तसंस्थेच्या मुख्य संपादिका सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांची निवड “समाजरत्न” या बहुमानासाठी झाली.

मुख्य संपादिका सौ. सुनिता राजेंद्र महाडिक या खऱ्या अर्थाने ‘समाजरत्न’ या किताबाला शोभून दिसतात. पत्रकारिता हा व्यवसाय फक्त बातमी पोहोचवण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी तो समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवला. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी-अडचणी, महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यावर त्यांनी सातत्याने लेखणी चालवली. त्यांची वृत्तपत्रकारिता ही संघर्षशील, निडर आणि सत्याला प्राधान्य देणारी आहे.

त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी ताकद म्हणजे सत्याशी असलेली नितांत निष्ठा. त्या कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाहीत, कुठलीही यू भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी घेत नाहीत; तर फक्त आणि फक्त “लोकहितासाठी” कार्य करतात. पत्रकारितेतील योगदान पत्रकारिता हे क्षेत्र अत्यंत कठीण आणि जबाबदारीचं मानलं जातं. पण सुनिता ताईंच्या लेखणीतून समाजातील उपेक्षित, पीडित, वंचित यांचा आवाज सतत उमटत राहिला. त्यांच्या प्रत्येक बातमीमध्ये “सत्याचा आवाज” असतो, आणि त्याचबरोबर “तो उपाय कसा काढता येईल” हा विधायक दृष्टिकोनही असतो. सामाजिक कार्यातील जिद्द पत्रकारितेसोबतच त्या सामाजिक चळवळींमध्ये नेहमी पुढे राहिल्या. त्यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!